Ad will apear here
Next
ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यासाठी हिमायतनगरमध्ये व्यवस्था


हिमायतनगर :
शहरात सध्या डेंग्यू, मलेरिया, टायफॉइडसारख्या आजारांच्या साथी आहेत. या पार्श्वभूमीवर, नगरपंचायतीच्या वतीने वृत्तपत्र, सोशल मीडियाद्वारे शहरात जनजागृती करण्यात येत आहे. नगरपंचायतीमार्फत संपूर्ण शहरात लवकरच धूर फवारणी करण्यात येणार आहे. ओला व सुका कचरा संकलनासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी नुकत्याच कचराकुंड्या बसविण्यात आल्या. 

२३ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्याधिकारी प्रियांका टोंगे, नगराध्यक्ष कुणाल राठोड व उपनगराध्यक्ष मो. जावेद गन्नी यांच्या उपस्थितीत कचराकुंड्या बसविण्यात आल्या. ‘शहरातील सर्व नागरिकांनी या कचराकुंड्यांचा वापर करून शहर स्वच्छतेच्या दृष्टीने नगर पंचायतीला सहकार्य करावे,’ असे आवाहन नगराध्यक्ष कुणाल राठोड व मुख्याधिकारी प्रियांका टोंगे यांनी केले आहे. 



या वेळी उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, तहसीलदार एन. बी. जाधव, गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे नगरपंचायत कार्यालय परिसरात उपस्थित होते. शहरात जागोजागी कचराकुंड्या बसविण्याच्या कामास या वेळी सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्ष कुणाल राठोड, उपाध्यक्ष मो. जावेद, मुख्याधिकारी प्रियांका टोंगे, नगरसेवक रामभाऊ ठाकरे, नगरसेवक प्रतिनिधी अन्वरखान पठाण, सदाशिवराव सातव, नगरसेवक प्रभाकर अण्णा मुधोळकर, सावन डाके, गुफरान भाई, विनायक मेंडके, अभियंता रमाकांत बाच्छे, शेख मेहबूब, बालाजी हरडपकर, विठ्ठल शिंदे, शामसुंदर पाटील, संदीप उमरे, विठ्ठल बनसोडे यांच्यासह स्वच्छता कर्मचारी या वेळी उपस्थित होते. 



‘ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी ६० मोठ्या कुंड्या व ४० लहान कुंड्या नगर पंचायतीने आणल्या आहेत. त्या कुंड्या प्रत्येक वॉर्डात लावण्यात येणार आहेत. कचरा उचलणे ही नगर पंचायतीची जबाबदारी आहे, तसेच प्रत्येक नागरिकाने आपापल्या घरातील ओला व सुका कचरा वेगळा करूनच कचराकुंड्यांत टाकावा,’ असे आवाहन नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी केले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZQUCG
Similar Posts
‘हुजपा’ महाविद्यालयात बिरसा मुंडा जयंती साजरी हिमायतनगर : शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयामध्ये १५ नोव्हेंबर २०१९ रोजी बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आले होते. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन केले
महाशिवरात्रीनिमित्त हिमायतनगरमध्ये परमेश्वर मंदिरात यात्रा हिमायतनगर : हिमायतनगर म्हणजेच पूर्वीचे वाढोणा येथील श्री परमेश्वर हे जागृत देवस्थान असून, नवसाला पावणारा देव म्हणून त्याची ख्याती आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने, जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ आणि आंध्र प्रदेशातील असंख्य भाविकांनी श्री परमेश्वराचे दर्शन घेतले. महाशिवरात्रीनिमित्ताने भक्तांनी मध्यरात्री
हा माझा नव्हे, सर्वसामान्य जनतेचा विजय : माधवराव पाटील हिमायतनगर : ‘विधानसभा निवडणुकीत झालेला विजय माझा नसून, सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. मी पद मिळण्यासाठी आमदार झालो नाही. या भागातील मागील पाच वर्षांचा ‘बॅकलॉग’ भरून काढायचा आहे. तुमच्यासोबत समस्यांची चर्चा करून त्या सोडवण्यासाठी आणि विकास घडवून आणण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार आहे. मी आमदार झाल्यामुळे मला वेगळे समजू नका
पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची भरपाई तात्काळ देण्याची मागणी हिमायतनगर : नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून प्रशासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि सरसकट पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language